पुढील आठवड्यात पाच दिवस बँका बंद

stirke
नवी दिल्ली – २० तारखेच्या आधीच जर काही बँकेची महत्त्वाची कामे असतील तर ती उरकून घ्या, बँकेची कामे जर २० तारखेपर्यंत केली नाहीत तर तुम्हाला पाच दिवस वाट पाहावी लागेल. कारण बँका २० तारखेनंतर ५ दिवस बंद असणार आहेत. बँका २१ ते २६ डिसेंबरदरम्यान ५ दिवस बंद असतील.

बँक कर्मचाऱ्यांबाबत केंद्राच्या नीती विरोधात २१ डिसेंबर रोजी ऑल इंडिया बँक ऑफिसर कन्फडरेशनने (AIBOC) संपावर जाण्याचा निर्णय घेतला असून बँकांकडून संपाचे हत्यार वेतनवाढ आणि बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलयाच्या निर्णयाला विरोध यासाठी उपसण्यात आले आहे. त्यामुळे २१ डिसेंबर रोजी संप, २२ डिसेंबर रोजी गुरुनानक जयंती आणि २३ डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. सोमवारी म्हणजे २४ डिसेंबर रोजी बँका उघडतील पण तुम्हाला मोठ्या गर्दीचा सामना करावा लागू शकतो. त्यानंतर ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबर रोजी सुट्टी आणि २६ डिसेंबर रोजी युनायटेड फोरमने पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बँका बंद असल्याने एटीएममध्ये देखील गर्दीचा सामना करावा लागू शकतो. बँकांना सुट्टी असली तरी एटीएमध्ये पैसे टाकण्याचं काम सुरु असणार आहे.

Leave a Comment