रामदेवबाबांकडून पतंजलीचा आयपीओ येत असल्याचे संकेत

ipo-pantanjali
योगगुरू रामदेवबाबा यांनी बुधवारी पतंजली आयुर्वेदचा आयपीओ लवकरच येईल असे संकेत दिले आहेत. शेअर बाजारातील लिस्टिंग बद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी याच महिन्यात आम्ही गुड न्यूज देत आहोत असे उत्तर दिले.

एक छोटी आयुर्वेद औषधी कंपनी म्हणून व्यवसायात उतरलेल्या पतंजलीने आज बहुराष्ट्रीय एफएमसीसी कंपन्यांसमोर मोठे आव्हान खडे केले आहे. पतंजलीने अनेक उत्पादने बाजारात आणून त्यांचा विस्तार केला आहे. इतकेच नव्हे तर येत्या ३ ते ५ वर्षात कंपनीचा महसूल २० हजार कोटींवर नेण्याचे ध्येय ठेवले आहे. २०१५-१६ मध्ये कंपनीची उलाढाल १० हजार कोटी होती. २०११ -१२ मध्ये कंपनीची उलाढाल अवघी ५०० कोटी होती. सध्या कंपनीपुढे वितरण संदर्भात काही अडचणी आहेत तसेच जीएसटी लागू झाल्याने कंपनीच्या महसुलात पाच वर्षात प्रथमच घट नोंदविली गेली आहे. मार्च २०१८ पर्यंत कंपनीचा महसूल ८१४८ कोटीवर होता असेही समजते.

Leave a Comment