भारताची मनिका बात्रा ठरली ब्रेकथ्रू टेबलटेनिस स्टार

manika-batra
भारताची २३ वर्षीय टेबलटेनिस पटू मनिका बात्रा हिला यावर्षी ब्रेकथ्रू टेबलटेनिस स्टार म्हणून निवडले गेले आहे. इंटरनॅशनल टेबलटेनिस फेडरेशनने तिला हा सन्मान दिला असून हे अॅवॉर्ड मिळविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनिकाने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये चार तर आशियाई स्पर्धेत एक पदक कमावले आहे.

गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने गोल्डपदकाची कमाई केली आणि सिंगल्स मध्ये हे पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या एशियाड मध्ये तिने मिक्स डबल मध्ये कांस्य पदक मिळविले. तिला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले आहे.

मिळालेल्या सन्मानाबद्दल मनिकाने आनंद व्यक्त केला असून २०१८ हे वर्ष तिच्यासाठी खूप छान गेले असे म्हटले आहे.

Leave a Comment