बेल्जियम भारतीय पर्यटकांना करतेय आकर्षित

belgium
बॉलीवूड, बिअर यासोबत ब्रुसेल्स आणि ब्राग्स शहराच्या सौदर्याचा वापर भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे बेल्जियम दूतावासाचे म्हणणे आहे. भारतीय पर्यटक आणि विद्यार्थी मोठ्या संखेने बेल्जियम मध्ये यावेत यासाठी बेल्जियम सरकार खास प्रयत्न करत आहे. भारतीयानी त्यांचा देश समजावून घ्यावा अशी तेथील सरकारची इच्छा आहे.

brussels
भारतीय नागरिकांमध्ये सध्या प्रवासाची क्रेझ वाढली आहे आणि युरोपीय देशांना ते पहिली पसंती देत आहेत. त्यामानाने बेल्जियम आकर्षक असूनही त्याबद्दल फारशी माहिती नसल्याने भारतीय पर्यटक कमी येतात. ब्रुसेल्स हे महत्वाचे शहर सुंदर आहेच पण बिअरचे आगार आहे. येथे नुकतीच इंडिअन बिअर लाँच केली गेली. शिवाय येथील अम्युझमेंट पार्क, संग्रहालये, ऐतिहासिक इमारती खूपच प्रेक्षणीय असून अनेक बॉलीवूड चित्रपटांचे शुटींग येथे झाले आहे.

manaken
ब्रुसेल्समधील सेंट वाबो कॅथेड्रल, लेक ऑफ लव, मोक्याची ग्रँड प्लेस पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण केंद्र ठरले आहेत. शिवाय ३०० वर्षे जुन्या या ग्रँड प्लेस मध्ये मिळणारे वॉफल्स खवैयांची जिव्हा तृप्ती करतात. अनेक रेस्टॉरंटस, कॅफे, कॉफी शॉपस ग्राहकांच्या तैनातीसाठी सज्ज आहेत. युरोपमधील सर्वात मोठे कोर्टहाउस मुद्दाम पाहावे असे. तसेच या चौकातील शु शु करणाऱ्या बालकाचे शिल्प तर जगभर प्रसिद्ध आहे. कधी कधी या बाळाला कपडेही घातले जातात.

Leave a Comment