दिल्लीतील विद्यार्थी गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी व्हॅलेंटाईन डेला करतात व्हर्जिन ट्रीची पूजा

Virgin-tree
एक बाभळीचे झाड दिल्ली यूनिव्हरर्सिटीच्या हिंदू कॉलेजमध्ये असून येथील विद्यार्थी या झाडाला ‘व्हर्जिन ट्री’ (Virgin Tree) म्हणतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लव्हर्स पॉईंटसाठी प्रसिद्ध असलेल्या या झाडाची खास पूजा केली जाते.
Virgin-tree1
या झाडाला व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पाणी भरलेल्या लाल रंगाच्या फुग्यांनी आणि कंडोमने सजवले जाते. फुगे आणि कंडोमपासून हार्ट शेप तयार केला जातो. विद्यार्थी त्यानंतर या झाडाजवळ ‘दमदमी माई’चा फोटो लावतात. दमदमी माई एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला बनवले जाते. दमदमी माई म्हणून निवड झालेल्या अभिनेत्रीचा फोटो झाडावर लावला जातो.
Virgin-tree2
या पूजेविषयी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये विचित्र मान्यता आहे. विद्यार्थ्यांच्या मते, या झाडाची व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पूजा केल्याने आणि प्रसाद ग्रहण केल्याने सहा आठवड्यांच्या आत गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड मिळतो. आणखी एक मान्यता म्हणजे, जर एखादी व्यक्ती व्हर्जिन असेल, तर वर्षभरात त्याची व्हर्जिनिटी भंग होते.

Leave a Comment