आज अवकाशात होणाऱ्या उल्का वर्षावानिमित्ताने गुगलचे डुडल

google1
नवी दिल्ली – किमान दहा ते बारा उल्का दरवर्षी पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. पृथ्वीवर आजपर्यंत सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत. पृथ्वीच्या सभोवती अजूनही काही उल्का प्रदक्षिणा घालत आहेत. त्यातील काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. आकाशात आज उल्कांचा पाऊस पडणार आहे. नेहमीप्रमाणे गुगलने उल्काचे शानदार डुडल काढले आहे. डुडलद्वारे उल्कावृष्टीचा शानदार नजराना गुगलने सादर केला आहे.

सर्वजण आकाशात प्रत्येकवर्षी होणाऱ्या उल्कांच्या वर्षावाचा आतुरतेने वाट पाहत असतात. आज १३ डिसेंबर २०१८ रोजी मध्यरात्री आकाशात उल्कांचा वर्षाव दिसणार आहेत. उल्कांच्या वर्षावाला ‘जेमिनिड मीटियोर शॉवर’ म्हटले जाते. उल्कांचा वर्षाव पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला शहरापासून दूर जावे लागेल. उल्कावृष्टी प्रत्येकवर्षी डिसेंबर महिन्यात होते. उल्कावृष्टी Phaethon मधील एस्ट्रॉयडमुळे होते. वातावरण ठिक असेल तर आज उल्कांचा वर्षाव व्यवस्थीत पाहता येईल. ढगाळ वातावरण असल्यास उल्का पाहता येणार नाहीत. उल्का पाहण्यासाठी डेलिस्कोप किंवा कोणत्याही दुर्बिणीची गरज भासणार नाही. तुम्ही रात्री ९ नंतर उल्कांचा वर्षाव पाहू शकता.

Leave a Comment