चॅरेटीसाठी पैसे गोळा करण्यासाठी एकाचवेळी अख्ख्या गावाने कपडे काढून केले फोटोशूट

photo
लंडन – एका वेगळ्याच प्रकारचे फोटोशूट लंडनच्या आयवेड गावात करण्यात आले. या गावातील एक, दोन नाही तर सगळ्याच नागरिकांनी नग्नावस्थेत फोटोशूट केले. एका कॅलेंडरसाठी हे फोटोशूट करण्यात आले होते. या फोटोशूटचा उद्देश चॅरेटीसाठी पैसे गोळा करण्याचा होता. २४ लोकांनी या फोटोशूटमध्ये सहभाग घेतला होता. फोटोग्राफरचा देखील यामध्ये समावेश होता.
photo1
ही संकल्पना लॉरा चीजमॅन या ब्यूटिशियनची होती. जवळपास १५ वर्षांपासून या गावात ३९ वर्षीय लॉरा राहत आहे. लॉराच्या मते, त्यांच्या मनात हा विचार दोन आठवड्यापूर्वी आला. याबाबत त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले. त्यानंतर लोकांशी संपर्क साधला. लोकांना माहीत झाल्यावर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला. लाराने सांगितले की, लोकांनी एकत्र यावे आणि त्यांना आनंद मिळावा यासाठी वेगळे काही करण्याची लॉराची इच्छा होती.
photo2
लॉराने सांगितले की, थंडी असल्यामुळे लोकांना सुरूवातीला थोडा त्रास झाला. पण यामागचे कारण लोकांना सांगितल्यावर त्यांनी कोणताच विचार न करता आपले कपडे काढण्यास सुरूवात केली. गावातील लोकांनी सांगितले की, हे काम मुलांसाठी करायचे आहे समजल्यानंतर लगेच आम्ही सहभाग घेतला. सुरूवातीला १००कॅलेंडर छापण्यात येणार आहेत. याद्वारे जवळपास १ लाख रूपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment