अनेक पुरुषांसोबत लग्न करु शकतात खासी अदिवासी महिला

khasi
अनेक समाजतील लोक जगभरात असून प्रत्येक समाजाचे आपले राहणीमान, परंपरा आणि वेगवेगळे रितीरिवाज आहेत. यात काही आदिवाश्यांच्या परंपरा खुप हैराण करणा-या आहेत. अशीच एक खासी अदिवासी ही जात आहे. विशेषतः भारताच्या मेघालयमध्ये हा समाज राहतो. पुरुषांऐवजी स्त्रीप्रधान संस्कृती असलेला हा एक निवडक समाजातील एक समाज आहे.
khasi1
आईच्या नावावर या समाजामध्ये सर्व संपत्ती असते. ही संपत्ती यानंतर मुलीच्या नावे केली जाते. महिलांचे समाजामध्ये वर्चस्व आहे. अनेक पुरुषांसोबत या महिला लग्न करु शकतात. यासोबतच आपल्या सासरीच पुरुषांना राहावे लागते. पण पुरुषांनी ही प्रथा काही काळापुर्वीपासून बंद करण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की, महिलांना आम्हाला कमी लेखायचे नाही, पण समान अधिकार आम्हाला हवे आहेत. या समाजातील महिलांना कुटूंबातील अनेक निर्णय घेण्याचा अधिकार असतो. या समाजात मुलीचा जन्म झाल्यावर मोठे सेलिब्रेशन केले जाते. पण मुलाचा जन्म झाल्यावर जास्त आनंद होत नाही. यासोबतच येथील बाजार आणि दुकानांमध्ये महिला काम करतात. मुलाचे आडनावही आईच्या नावावर असते.
khasi2
संपत्तीमधील जास्त वाटा खासी समुदायातील सर्वात लहान मुलीला मिळतो. याच कारणामुळे तिला आई-वडील, अविवाहित भाऊ-बहीण आणि संपत्तीची देखरेख करावी लागते. लहान मुलीला खातडुह म्हटले जाते. तिचे घर प्रत्येक नातेवाईकासाठी खुले असते. या समाजात मुलगी बालपणीच प्राण्यांसोबत खेळतात आणि त्यांचा वापर आभूषण म्हणून करतात.