या सुल्तानची होती १ हजार मुले, गिनीज बुकमध्ये आहे नोंद

sultan
मोरक्को – मोरक्कोवर १७ व्या शतकात एक असा राजा राज्य करत होता, ज्याची १ हजार मुले होती. एवढी मुले एखाद्या पुरूषाने जन्माला घालण्याचा इतिहासात विक्रम आहे. या शासकाचे नाव सुल्तान मौलय असे होते. इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचा वंशज असल्याचा तो स्वतः दावा करत होता. बऱ्याच काळापासून सुल्तानची १ हजार मुले जन्माला घालण्याची गोष्ट चर्चेचा विषय बनला आहे. वैज्ञानिकांच्या एका टीमने कॅलक्युलेशनच्या आधारे एखादा व्यक्ती शेकडो महिलांसोबत संबंध प्रस्थापित करून ११७१ मुलांना जन्म दिल्याचे सांगितले आहे.
sultan1
इतिहासकारांचा असा दावा आहे की, सुल्तानच्या ४ पत्नी आणि ५०० दासी होत्या. त्याला यांच्याकडूनच ११७१ मुले झाली होती. ३२ वर्षांपर्यंत एखादा व्यक्ती वेगवेगळ्या महिलांसोबत संबंध बनवत असेल तर हे शक्य असल्याचे वैज्ञानिकांना एका कॅलक्युलेशनच्या आधारे सापडले आहे. फक्त त्याच्या बायका आणि मुलांमुळे हा शासक चर्चेत नव्हता तर त्याच्या क्रूरतेचे किस्से ऐकल्यावर आजही लोकांच्या अंगावर शहारे उठतात. एका शहरामध्ये या सुल्तानने एकट्यानेच ४०० लोकांचे मुंडके कापले होते. त्यानंतर ३० हजार लोकांना मृत्यूच्या दारात लोटले होते. अतिशय रागीट, संशयी तसाच निर्दयी मौलय राजा होता. त्याच्या बायकोकडे एखाद्या व्यक्तीने पाहिल्यास त्या व्यक्तीचे डोळे फोडत होता. त्याने अनेक महिलांसोबत जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करत होता आणि महिलेने त्याला विरोध केल्यास तो त्यांचे स्तन तलवारीने छाटत होता.
sultan2
दीड लाख सैनिकांच्या मदतीने मौलयने मोरक्कोमध्ये दहशत पसरवली होती. मौलय त्याच्या संशयी स्वभावामुळे त्याने त्याच्या ४ पत्नी आणि ५०० दासींमागे गुप्तहेरांद्वारे नजर ठेवत होते. त्याला थोडा जरी संशय आला की तो त्या महिलेचे तुकडे करत होता. हजारो मुलांना जन्माला घालणाऱ्या या शासकाचा मृत्यू ८२व्या वर्षी झाला होता. त्यानंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध सुरू झाले होते. त्यानंतर १७५५मध्ये आलेल्या मोठ्या भूकंपामुळे मौलयचे साम्राज्य संपुष्टात आले. मोरक्कोमध्ये आजही आहेत. सुल्तान मौलयचे नाव अनेक शोध घेतल्यानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दाखल आहे. येथे सुल्तानचे ८८८ मुले असल्याचा दावा केलेला आहे. पण इतिहासकार सुल्तानचे ११७१ मुले असणाऱ्या गोष्टीला समर्थन देत आहे.