किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मदत करणार गौतम गंभीर

gautam-gambhir
मुंबई – नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून भारताला विश्वविजेता बनविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा सलामीचा माजी फलंदाज गौतम गंभीरने निवृत्ती स्वीकारली आहे. पण आयपीएलचा मौसम जवळ येताच गौतम गंभीरच्या नावाची जोरात चर्चा होत आहे. यंदाच्या वेळी गौतम गंभीर किंग्ज इलेव्हन संघासोबत काम करणार आहे.

पंजाब संघाने आणि गौतमने याबाबत टि्वट केले आहे. गंभीर या संघासोबत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे. तर माईक हसी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.


गौतमला संघासोबत जोडला गेल्याने पंजाब संघाने शुभेच्छा दिल्या आहेत. त्याला गौतमनेही उत्तर देत लवकरच भेटू अशी पोस्ट टाकली आहे. आपल्या फलंदाजीने सामन्याचा निकाल बदलणारा गौतम आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत कशी कामगिरी करणार हे पाहणे हे औस्तुक्याचे ठरणार आहे. त्याच्या कर्णधारच्या नेतृत्वाखाली केकेआरला २ वेळा आयपीएलचा किताब मिळवून दिला होता. गेल्या वर्षाचा आयपीएल त्याच्यासाठी खास नव्हता. मात्र यंदाच्या वेळी तो पंजाब नव्या संघासोबत जोडला जाणार आहे.

Leave a Comment