दुसऱ्या कसोटीसाठी अश्विन-रोहितच्या जागी भुवनेश्वर-उमेशला संधी

team-india
पर्थ – बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांना १३ सदस्याच्या संघात संधी दिली आहे. दुसऱ्या कसोटीतून भारताचा हुकमी एक्का आर. अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे बाहेर पडले आहे. अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला तर रोहितच्या जागी हनुमा विहारीला संधी मिळाली आहे.


वेगवान गोलंदाजांना पर्थची खेळपट्टी ही पोषक असल्याने १३ जणांच्या संघात भारतीय संघाने ५ वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. पण अंतिम ११ जणाच्या संघात कुणाला संधी मिळणार हे उद्याच कुळून येईल. इशांत, शमी आणि बुमराह या त्रिकुटाने पहिल्या कसोटीत भेदक मारा केला होता. पर्थ कसोटीत आणखी एक वेगवान गोलंदाज निवडल्यास भारतीय गोलंदाजी अधिक मजबूत होईल.

ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजीने अॅडलेड कसोटीत डोके वर काढले होते. यावर भारतीय गोलंदाजांनी तोडगा न शोधल्यास पर्थ कसोटी भारताचा पराभव होऊ शकतो. इंग्लंड दौऱ्यातही भारताला शेवटच्या फलंदाजी फारच तरसावले होते. त्यामुळे भारताचा मालिकेत पराभव झाला होता.

Leave a Comment