१०२ वर्षांच्या आजीबार्इंनी रचला १४ हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग करण्याचा इतिहास

grandmother
अनेक जण म्हातारपणात सर्वाधिक प्राधान्य विश्रांतीला देताता. अनेकांना वयाची ६०- ७० वर्ष पार केल्यानंतर तर स्वत:चे काम देखील व्यवस्थितपणे करता येत नाहीत. पण एक थक्क करणारा कारनामा आस्ट्रेलियातील एका १०२ वर्षीय आजीबार्इंनी करून दाखविला आहे. या वयात सुद्घा या आजीबार्इंनी चक्क १४ हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग करण्याचा इतिहास रचल्यानंतर सोशल माध्यमांवर गोड चेहऱ्याच्या या आजीबार्इंची जोरदार चर्चा सुरू आहे.

या आजीबार्इंचे नाव एड्रेनालाईन जंकी इरेन ओ’शेआ असे आहे. त्या असा कारनामा करणाऱ्या जगातील सर्वात वयोवृद्घ असल्याचे मानले जात आहे. आजीबार्इंनी स्कायडाइव्हिंगच्या थराथक अनुभवानंतर आनंद व्यक्त केला. आजीबार्इंनी यानंतर आपल्याला एकदम सामान्य वाटत असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. त्यांचे गाल आकाशातून ताशी २२० किलोमीटर वेगाने खाली येताना वेगाने फडफडत होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर भितीचा थोडाही भाव दिसत नव्हता.

२०१६ मध्ये या आजीबार्इंनी १०० वा वाढदिवस साजरा करताना स्कायडाइव्हिंग विक्रम केला होता. पण त्यांनी आता वयाच्या १०२ व्या वर्षी अशा प्रकाराचा कारनामा करत इतिहास रचला आहे. त्यांनी स्कायडाइव्हिंग मोटार न्यूरॉन रोगाच्या निदानासाठी निधी गोळया करण्याच्या उद्देशाने केले.

Leave a Comment