जगबुडीतून वाचणार ब्रूस आणि त्याचे कुटुंब

arc2
जगबुडी म्हणजे महाप्रलय झाला, किंवा अणूहल्ल्यात जगाचा विनाश झाला तरी कॅनडामधील ८३ वर्षीय ब्रूस आणि त्याचे जवळचे कुटुंबीय त्यातून वाचू शकतील असे एक मस्त घर किंवा भुयार ब्रूसने तयार केले असून त्यासाठी एक दोन नाही तर अर्धे आयुष्य वेचले आहे. विशेष म्हणजे ब्रूसने ३८ वर्षापूर्वी म्हणजे १९८० साली असा अभेद्य बंकर बांधायचा म्हणून चक्क ४२ स्कूलबस खरेदी केल्या आणि जमिनीखाली १५ फुटावर त्यापासून भक्कम न्युक्लीअर शेल्टर बनविला. ब्रूसने त्यासाठी त्याकाळी बस खरेदीसाठी १२६०० डॉलर्स खर्च केले होते.

ब्रूस सांगतो हि कल्पना त्याला बायबल वरून मिळाली. बायबल मधील कथेनुसार महाप्रलय झाला तेव्हा नोव्हा नावाच्या दूताने मनसे, प्राणी वाचविण्यासाठी एक प्रचंड जहाज बनविले होते त्याचे नाव होते आर्क. ब्रूसने बनविलेल्या घराला आर्क टू असे नाव दिले आहे.

arc21
ब्रुसने जमिनीखाली बांधलेल्या या घरात ५०० लोक एकावेळी ३ आठवडे आरामात राहू शकणार आहेत. या घरावर रेडीएशनचा परिणाम होणार नाही. या घरात आवश्यक हत्यारे, रेडीओ, कम्युनिकेश सिस्टीम, डीझेल जनरेटर, पाण्याची टाकी आणि दोन किचन अश्या सोयी केल्या गेल्या आहेत. मुलांना खेळण्यासाठी १ खोली आणि आवश्यक वस्तू आहेतच. ब्रूसने आर्क टू उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा बंकर असल्याचा दावा केला आहे.

Leave a Comment