चीनी स्मार्टफोन कंपनी विवोने बुधवारी त्यांच्या नेक्स सिरीजचा विस्तार करताना १० जीबी रॅमसह ड्युअल डिस्प्ले एडिशन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनला ड्युअल डिस्प्ले बरोबर रिअरला तीन कॅमेरे दिले गेले असून विबो साईटवर हा फोन नोंदविला गेला आहे. या फोनची किंमत चीनमध्ये ४९९९ युआन म्हणजे भारतीय रुपय्ता ५२ हजार आहे.
विवो नेक्स ड्युअल डिस्प्ले स्मार्टफोन लाँच
कंपनीचे उपाध्यक्ष स्पार्क यांच्या म्हणण्यानुसार नेक्स सिरीज युजरना असाधारण अनुभव देईल आणि भविष्यातील आमचे स्मार्टफोन कसे असतील याची कल्पना देईल. या फोनला ६.४९ इंची अल्ट्रा फुलव्ह्यू डिस्प्ले दिला गेला असून मागच्या भागात जादा ५.४९ इंची सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. यात लुनर रिंग आहे आणि त्यात नोटिफिकेशन रंगांच्या माध्यमातून दाखविली जातात. या फोनला १२ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, रात्री व्हिडीओ घेण्यासाठी विशेष कॅमेरा आणि टाईम ऑफ फ्लाईट थ्रीडी कॅमेरा दिला गेला आहे. डिस्प्ले मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर शिवाय थ्री दि फेस रेक्गनिझेशान सेन्सिंग तंत्रज्ञान वापरले गेले आहे.