इशा अंबानीच्या लग्नाचा खर्च ७२० कोटींवर

anandpi
देशाचे बडे उद्योजक रिलायंसचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी लाडकी लेक इशा हिच्या लग्नात हात अगदी मोकळा सोडून खर्च केला असल्याचे समजते. ब्लुमबर्ग क्विंटच्या अहवालानुसार मुकेश यांनी लेकीच्या लग्नासाठी अंदाजे १०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७ अब्ज २० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे हा विवाह आशियातील सर्वात महागडा विवाह ठरला आहेच पण त्याने ब्रिटीश राजघराण्यातील विवाहाच्या खर्चाची बरोबरी केली आहे.

इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या शाही विवाहासाठी जगभरातून वऱ्हाडी आले त्यात हिलरी अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन होत्या तसेच तमाम बॉलीवूड सेलेब्रिटी आणि बियोन्से सारख्या लोकप्रिय परदेशी कलाकारांचा समावेश होता.

ब्रिटन राजघराण्यात ३७ वर्षापूर्वी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचा विवाह झाला तेव्हा ११० दशलक्ष डॉलर्स म्हणजे ७ अब्ज ९१ कोटी रुपये खर्च केले गेले होते आणि तो जगातील सर्वात महागडा विवाह ठरला होता. ईशाचा विवाह त्याखालोखाल महागडा ठरला आहे.

Leave a Comment