अवश्य अनुभवा पटनीटॉप मधील स्नोफॉल

patni
जम्मू काश्मीर राज्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. भारताचे नंदनवन असलेल्या या राज्यातील उधमपूरपासून जवळ असेलेले पटनीटॉप हे एक अतिशय सुंदर हिलस्टेशन आहे. थंडीच्या दिवसात काश्मीरला जाण्याचा विचार कुणी करणार नाही पण पटनीटॉप या हिलस्टेशनचे वैशिष्ट आहे तेथला हिमवर्षाव. कितीही थंडी असली तरी हा अनुभव आयुष्यात एकदा घ्यावा असाच आहे. अजून या हिलस्टेशनला म्हणावी तशी पर्यटकांची झुंबड नसते त्यामुळे निवांतपणे येथील निसर्ग अनुभवता येतो.

paragly
श्रीनगर हायवेवरील पटनीटॉप हा सर्वात उंच पॉइंट. लोअर हिमालयाच्या शिवालिक रेंजच्या वरच्या भागात हा प्रदेश येतो. या ठिकाणी उन्हाळ्यात गेलात तर वेगळा निसर्ग अनुभवता येतो तसेच हिवाळ्यात त्याचे स्वरूप पूर्ण पालटलेले असते. पटनीटॉपचे खरे नाव पतन दा तालाब म्हणजे राजकुमारीचा तलाव. येथेऊन अगदी शेजारून चिनाब नदी वाहते. मोठी सरोवरे, हिरवीगार कुरणे उन्हाळ्यात दिसतात तर थंडीच्या दिवसात या सर्व भागावर बर्फाची चादर असते.

skeing
येथील स्नोफॉल पाहण्याची एक वेगळीच मजा आहे. नाथा टॉप हे या भागातले सर्वात सुंदर स्थळ. ७ हजार फुट उंचीवर असलेल्या या थिअकनवरुन चोहोबाजूने बर्फाच्छादित शिखरे दिसतात तसेच येथे पॅराग्लायडिंग, स्कीईंग, ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो. येथून २० किमी सनासर सरोवर असून त्याचे नाव सना आणि सर या दोन गावांच्यावरून पडले आहे. येथे दाट जंगले, उंच पर्वत यांचे आगळे सौदर्य आहेच पण रॉक क्लायम्बिंग, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून सफारी यांचा आनंद लुटता येतो. पटनीटॉप नंतर वेळ असेल तर थोडा मुक्काम वाढवून कटरा, डलहौजी, धरमशाला, पालनपुर या ठिकाणांना भेटी देता येतात.

Leave a Comment