जगभरात अनेक आदिवासी जमात आहेत आणि त्यांचा आपल्या विचित्र परंपरा आहेत. अफ्रीकेच्या नॉर्थ नामीबियाच्या कुनऍन प्रांतातील हिम्बा ट्राइबच्या महिलांना अंघोळ करण्यास मनाई आहे. त्यांना तरीदेखील आफ्रीकेतील सगळ्यात सुंदर महिला मानले जाते.
अंदाजे १० ते ५० हजार लोक कुनॅन प्रांतात राहणाऱ्या हिम्बा समाजात राहतात. अफ्रीकेतील सगळ्यात सुंदर महिला म्हणून हिम्बा ट्राइबच्या महिलांना मानले जाते. पण अंघोळ करण्यास येथील महिलांना मनाई आहे, त्याचबरोबर येथील महिलांना हातही पाण्याने धुता येत नाही. पण या महिलांची स्वत:ला स्वच्छ ठेवण्यासाठी एक खास पद्धत आहे.
महिला अंघोळ न करता हिम्बा समाजातील काही खास जड़ी-बूटिंचे पाणी उकळुन त्याच्या धुराने आपले शरीर साफ करतात. त्यांच्या शरीरातून या धुरांमुळे घाण वास येत नाही त्यामुळे त्यांचे सौंदर्य टिकून राहते. उन्हापासून या ट्राइबच्या महिला आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी खास पद्धतीचे लोशन लावतात. प्राण्यांची चरबी आणि हॅमाटाइटच्या लेपापासून हे लोशन तयार केले जाते. हॅमाटाइटच्या धुळीमुळे त्यांच्या शरीराचा रंग लाल होतो. हे लोशन त्यांचे किड्यांपासून संरक्षण करते.