उद्यापासून वटणार नाहीत स्टेट बँकेचे धनादेश

state-bank
नवी दिल्ली- आणखी एक सुविधा देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने बंद केली आहे. एसबीआयमध्ये तुमचे खाते असल्यास ही सुविधा बंद झाल्यानंतर तुम्हालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण एसबीआय १२ डिसेंबरपासून जुना धनादेश स्वीकारणार नाही. त्यामुळे तुमचे जुने चेकबुक कालबाह्य होणार आहे.

एसबीआयने ग्राहकांना जुने चेकबुक बँकेत जमा करून नवीन चेकबुक घेण्यासाठी मेसेजही पाठवले आहेत. जेणेकरून जुने चेकबुक स्वीकार केले जाणार नाहीत. आरबीआयच्या निर्देशानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने याची अंमलबजावणी केली आहे. तीन महिन्यांपूर्वीच बँकेला आरबीआयने निर्देश देत सांगितले होते की, १ जानेवारी २०१९पासून नॉन सीटीएस चेकबुकचा वापर पूर्णतः बंद करण्यात आला पाहिजे. एसबीआयने आरबीआयच्या निर्देशांचे पालन करतच जुने चेकबुक परत मागवले आहेत.

ग्राहकांचे जुने चेकबुक जमा करून घेऊन बँक त्यांना नवीन चेकबुक देणार आहे. ३१ डिसेंबर २०१८ही नॉन सीटीएस चेकबुक बंद करण्याची डेडलाइन ठरवून देण्यात आली असली तरी ग्राहकांना एसबीआयने १२ डिसेंबरपासून जुने चेक स्वीकारणार नसल्याचे मेसेजच्या माध्यमातून सांगितले आहे.

Leave a Comment