मोरक्कोच्या या वाळवंटात अनेक वर्षांपासून ऐकू येत रहस्यमयी संगीत

Morocco
मोरक्को : अनेक वर्षांपासून मोरक्कोच्या वाळवंटातील एका ठिकाणी संगीत ऐकू येत आहे. येथे कधी विचित्र तर कधी ड्रम, गिटार, वायलिन किंवा इतर वाद्यांच्या ध्वनी ऐकू येतात. अशा वाळवंटी प्रदेशात राहणे अशक्य आहे तर मग याठिकाणी संगीत ऐकू येत असल्याची बाब एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही.या पट्टयात प्रवास करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, भूत-प्रेतांचे येथे वास्तव्य असून यात्रेकरूंना घाबरवण्यासाठीच ते असे आवाज काढत असतात. असे आता नाही तर अनेक दशकांपासून सुरू आहे. पण यामागचे नेमके कारण कोणीही शोधू शकले नाही.
Morocco1
पहिल्यांदाच चीनला १३ व्या शतकामध्ये यात्रेकरू मार्को पोलो पोहोचले तेव्हा अशाप्रकारचे आवाज त्यांनी तेथील वाळवंटी भागातही ऐकले होते. तेव्हा वाळवंटात भटकणाऱ्या आत्मा असल्याचा त्याने अंदाज लावला होता. पण एवढ्या कालांतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकाच प्रकारची घटना कशी घडू शकते हा एक प्रश्न उपस्थित राहतो.
Morocco2
वाळवंटात अशाप्रकारचे ऐकू येणाऱ्या संगीताचे कारण वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे. त्यांना अधिक काळापर्यंत झालेल्या परीक्षणानंतर या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यात यश आले आहे. वाळूच्या ढिगाऱ्याखालची वाळू सरकताना होण्याऱ्या कंपनांमुळे अशाप्रकारचे संगीत निर्माण होते असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. वाळूच्या कणांचा आकारही यासाठी कारणीभूत आहे. वाळूच्या कणांचा आकार आणि वाळू खिसकण्याची गती संगीतसारखे ध्वनीचे मुख्य कारण आहे. वरील सर्व प्रक्रिया हवेच्या वहणामुळे वातावरणात संगीत ध्वनीच्या रूपात पसरतात. काही ठिकाणी वाळूचे घनत्व जास्त असते तरी काही ठिकाणी हवेमुळे वाळू वेगाने खसकते, यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ध्वनी निर्माण होतात.

Leave a Comment