या सुंदर महिला डॉक्टरला तिचे सौंदर्याच होत आहे तिला अडचण

doctor
एडिलेड : ऑस्ट्रेलियाच्या एडिलेडमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरचे सौंदर्य तिचे शत्रु बनले आहे. याबाबत ३० वर्षीय डॉक्टर असलेल्या साराने सांगितले की, कशामुळे इतर लोक तिच्यासोबत सावत्रसारखा व्यवहार करत आहेत. तिला आणि तिच्या पतीला एकेदिवशी तर रेस्तरॉमधूनही बाहेर काढण्यात आले होते. यामागचे कारण तिच्या शरीरावर गोंदवण्यात आलेले टॅटू आणि सौंदर्य असल्याचे साराने सांगितले आहे.
doctor1
याबाबत साराने सांगितले की, ती वयाच्या १६ व्या वर्षापासून शरीरावर टॅटू गोंदवून घेत आहे. तिच्या चेहऱ्याव्यतिरिक्त शरीराच्या प्रत्येक अवयवावर टॅटू गोंदविलेले आहेत. साराला असे वाटते की, तिचे शरीर टॅटूमुळे आणखीनच सुंदर दिसत आहे. पण येथील लोकांना हे का? पसंद पडत नाही. मी शरीरावर टॅटू स्वतःच्या आनंदासाठी काढले. पण यामुळे माझ्या डॉक्टर असण्यावर आता लोक माझ्यावर संशय घेत आहेत आणि ते माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकांना ड्रग अॅडिक्ट किंवा वाया गेलेली यंगस्टर असल्याचे वाटते. आता टॅटूकडे रंगभेदप्रमाणे बघण्यात येत आहे.
doctor2
सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे साराने सांगितले की, ती मागीला काही दिवसांत तिच्या पतीबरोबर जेवण करण्यासाठी रेस्तरॉमध्ये गेली होती. बराच वेळ झाला तरी त्यांच्याकडे कोणीही ऑर्डर घेण्यासाठी आले नाही. पण त्यांच्यानंतर लोकांना ऑर्डर सर्व्ह करण्यात आली होती. थोड्या वेळाने मॅनेजरने त्यांना रेस्तरॉमधून जाण्यास सांगितले. कारण तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात टॅटू होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे ओपन टॅटू शो करण्यावर प्रतिबंध आहे आणि साराच्या तर पूर्ण शरीरावर टॅटू होते.
doctor3
वयाच्या १४ व्या वर्षापासून शरीराच्या विविध भागांवर सारा टॅटू गोंदवून घेत आहे. एवढ्या वर्षात तिने किती टॅटू गोंदवून घेतले हे तिलाच माहीत नाही. टॅटू करण्यासाठी तब्बल ३०० तासांचा वेळ दिल्याचे साराने सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑस्ट्रेलियातील अनेक ठिकाणी टॅटूसबंधी वेगवेगळे नियम आहेत. पण टॅटूमुळे कोणाला रेस्तरॉच्या बाहेर काढण्याचे वेगळेच प्रकरण आहे.

Leave a Comment