या हॉटलेपर्यंत पोहचण्यासाठी तुम्हाला चढाव्या लागतील तब्बल 60 हजार पायऱ्या

china
चीनमधील एका हॉटेलविषयी आम्ही आज तुम्हाला सांगत आहोत. जेड स्क्रीन हॉटेल जगातील दुर्गम हॉटेल्सपैकी एक असे आहे. तब्बल ६० हजार पायऱ्या या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी चढाव्या लागतात. एवढ्या उंचीवर असूनही सर्व प्रकारच्या सुविधा या हॉटेलमध्ये आहेत. हे हॉटेल चीनच्या यलो माउंटेन या पर्वतावर आहे. निसर्गाचा अद्भुत नजारा याठिकाणावरून पाहता येतो.
china1
पायऱ्या चढण्यात कोणाला काही त्रास असेल तर कुली खुर्चीवर बसवून हॉटलेपर्यंत घेऊन जातात. पर्यटकांसाठी याठिकाणी रोप-वे ची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. १८३० मीटर उंच ठिकाणावर हे हॉटेल स्थित आहे. वर पोहचल्यानंतर हंगशन माउंटेन रेंजचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. जगातील एकमात्र असे हॉटेल आहे ज्याठिकाणी तुम्ही एवढ्या पायऱ्या चढून जाऊ शकतात. एवढ्या उंचावर असून देखील याठिकाणी स्पा आणि स्विमिंग पूलसारख्या सर्वप्रकारच्या लक्झरीयस सुविधा उपलब्ध आहेत.

Leave a Comment