विमानात पहिल्यांदाच बसणे एक वेगळाच अनुभव असतो. आत बसल्यानंतरही विमानाच्या इंजिनच्या ताकदीचा भास होतो. आकाशात एखाद्या विशाल खेळणीरुपी हे वाहन नेमके कसे उडते आणि यासाठी इंधन किती लागतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कारण, प्रति लिटर ३० ते ८० लिटर मायलेज बाइकमध्ये पेट्रोल भरल्यास मिळेल हे सर्वांना माहिती आहे. पण आकाशात उडणाऱ्या विमानात किती इंधन खर्च होतो याबद्दलची उत्सुकता अनेकांना असेल. पण तितकेच धक्कादायक याचे उत्तर आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रति सेकंद ४ लिटर इंधन विमानाला उडण्यासाठी लागते. बोइंग ७४७ विमान याचे उदाहरण म्हणून पाहिल्यास, एक मिनिट उडताना या विमानास २४० लिटर जेट फ्यूल लागते. त्याप्रमाणे ७४७ विमानाच्या उड्डानात प्रति लिटर किती सरासरी मायलेज मिळते या प्रश्नाचे उत्तर कमाल ०.८ किमी असे राहील. हे विमान १२ तासांच्या उड्डानासाठी तब्बल १७२,८०० लिटर जेट फ्यूल खर्च करते.
एका बोइंग विमानाच्या वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीनुसार ७४७ बोईंग विमानात प्रति सेकंद १ गॅलन (४ लिटर) इंधन लागते. १० तास उड्डान घेत राहण्यासाठी या विमानाला किमान १.५० लाख लिटर इंधन लागेल. अर्थात प्रति किमीचा विचार केल्यास १२ लिटरमध्ये एक किमी उडू शकेल.