जमिनीखाली ३ हजार फुट वसलेले सुपाई गाव

supai
अमेरिकेचे मूळ रहिवासी रेड इंडिअन आता फारसे कुठे आढळत नाहीत मात्र काही रेड इंडिअन अजूनही अमेरिकेत वास्तव्यास आहेत. ग्रँड कॅनियनजवळच्या हवासू कॅनियन मध्ये सुपाई नावाचे एक गाव जमिनीखाली ३ हजार फुटावर वसलेले आहे. हे रेड इंडियन लोकांचे गाव आहे आणि जगभर इंटरनेटवर या गावाचा सर्च मोठ्या प्रमाणावर घेतला जातो कारण साहसी पर्यटनाचे हे आवडते ठिकाण आहे.

जगभरात अनेक प्रकारची गावे आणि शहरे आहेत. काही समुद्रात, काही बेटांवर, काही पहाडांवर, काही दऱ्याखोऱ्यात वसलेली आहेत. मात्र सुपाई चक्क जमिनीखाली ३ हजार फुट खोलात आहे. येथली संस्कृती वेगळी आहे आणि येथे जाण्याचा मार्गही खडतर म्हणावा असा आहे. तरीही येथे दरवर्षी ५५ लाख पर्यटक भेट देतात.

havasu
या गावाची मूळ लोकसंख्या २०८ च्या आसपास आहे. त्यांचा जगाशी संपर्क नाही. येण्याजाण्याची साधनेही अगदी मर्यादित आहेत. मोठा प्रवास पायी करावा लागतो तर टपाल अजूनही खेचाराच्या पाठीवरून पोहोचविले जाते. येथील निसर्ग आगळा वेगळा आहेच पण येथील हवासू धबधबा भुरळ पाडतो. पर्यटक येथे हेलिकॉप्टरने येऊ शकतात पण ते प्रमाणही कमी आहे. धबधबा परिसरात राहण्यासाठी चांगल्या सुविधा आहेत.

Leave a Comment