फोर्स मोटरची दमदार गुरखा एक्स्ट्रीम एसयुव्ही सादर

force
फोर्स मोटर्सने अखेरी त्यांची दमदार गुरखा एसयुव्ही एक्स्ट्रीम भारतात सादर केली आहे. या एसयूव्हीची किंमत १२ लाख ९९ हजार रुपये असून तिचे बुकिंग सुरु झाले आहे. फोर्सच्या गुरखा एसयूव्हीला भारतात फार प्रतिसाद मिळाला नव्हता तेव्हाच त्याचे पॉवरफुल व्हेरीयंट येणार याची चर्चा सुरु झाली होती.

हि एसयूव्ही बॉक्सि डिझाईनची आहे. ती फॅक्टरी फिटेड स्नोर्कलसह आहे. तिला २.२ लिटर इंजिन, अपग्रेडेड सस्पेन्शन सिस्टीम सह दिले गेले आहे. फ्रंट, रिअर मल्टीलिंक अॅरेंजमेंट दिल्याने हि हायस्पीड वरही स्टेडी राहते. तिचे इंटिरियर खास बनविले गेले आहे. सेंटर मध्ये नवीन कन्सोल, गिअर लिव्हर, लो रेशो ट्रान्स्फर लिव्हर, ३ दरवाजे असून तिला ५ स्पीड गिअर बॉक्स दिला गेला आहे. हि एसयूव्ही ६ सीटर हार्ड टॉप व ८ सीटर सॉफ्ट टॉप अश्या दोन व्हेरीयंट मध्ये मिळेल असे समजते.