झीलीमिली- नावाप्रमाणेच सुंदर हिल स्टेशन

jhilimili
पश्चिम बंगाल राज्यात अनेक सुंदर सुंदर ठिकाणे आहेत, दार्जीलिंग, गंगासागर या सारखी पर्यटन स्थळे जगभर प्रसिद्ध आहेत मात्र तितकेच सुंदर आणि अगदी निवांत असे आणखी एक हिल स्टेशन येथे आहे त्याचे नाव झिलमिली. बांबुरा जिल्ह्यात मुकुटमणिपूर पासून १५ किमीवर पहाडात वसलेले हे छोटेसे गाव निसर्ग सौदर्याचा अनोखा नमुना म्हणता येईल. या गावाकडे जाण्याची वाट राणीबंध पासून मुळी जंगलातून जाते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.

या गावाजवळ कान्साबाती नदी असून ते पिकनिक स्थळ आहे. येथे असलेल्या वॉच टॉवरवरून झीलीमिलीचे निरीक्षण करता येते. या भागात विविध प्रकारचे पक्षी मुबलक पाहायला मिळतात. जंगलात आदिवासी पाडे आहेत त्यांच्या संस्कृतीची, राहणीमानाची ओळख करून घेता येते. वर्षात एकदा येथे टूसु उत्सव साजरा होतो. त्यावेळी टूसु देवीची पूजा केली जाते आणि लोकनृत्ये, लोकसंगीत याचा आनंद लुटला जातो. या ठिकाणी जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा काळ चांगला आहेच पण त्यातही जानेवारी अगदी उत्तम. कारण त्यावेळी येथे अनेक उत्सव साजरे होतात आणि त्याची मजा आपण लुटू शकतो.

Leave a Comment