गरम पाणी पिण्याचे असेही आहेत फायदे

water
पाणी म्हणजे जीवन. मनुष्य पाणी न पिता राहू शकणार नाही. पाणी सेवनाचे अनेक फायदे शरीराला मिळत असतात त्यातील मुख्य म्हणजे आपले शरीर ओलसर राहते आणि त्वचा नरम राहते. तहान लागली कि आपण पाणी पितो तसेच खाल्ल्यानंतरहि पाणी आवश्यक असते.

हेच पाणी गरम करून प्यायले गेले तर त्याचे जादुई परिणाम शरीरावर होतात. रोज सकाळी एक ग्लास गरम पाणी पिण्याने पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते. पोटातील जळजळ कमी होते. तरुण वयात चेहऱ्यावर मुरमे पुटकुळया येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यावर क्रीम. लोशन असे अनेक उपाय केले जातात पण हवा तसा उपयोग होत नाही. या वयात सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी प्यायले तर काही दिवसात मुरमे कमी झाल्याचे आणि त्वचेचा पोत सुधारल्याचे दिसते.

hair
वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. सतत तीन महिने सकाळी गरम पाणी. लिंबू आणि मध सेवन केल्यास वजन उतरते. कारण या पेयामुळे अन्न पचन वेगाने होते. शरीरात साठलेली विषारी तत्वे सहज बाहेर टाकली जातात आणि शरीर डीटॉक्स होते. गरम पाण्याच्या सेवनाने शरीराचे तापमान वाढते व घाम येतो त्यामुळे शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार बनते.

गरम पाणी प्यायल्याने डोक्याची त्वचा नरम ओलसर राहते आणि कोंड्यापासून सुटका मिळते. केसांचे आरोग्य सुधारते, केस चमकदार, निरोगी बनतात आणि त्यांची वाढ वेगाने होते.. घसा दुखी असेल तर गरम पाण्याने त्याला आराम पडतो.

Leave a Comment