हे काय बोलून गेले शास्त्रीबुवा…

ravi-shastri
अॅडलेड – भारताने ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सामन्यानंतर मैदानात इंग्लिशमधून मुलाखत देत होते. पण शास्त्रींनीमुलाखती दरम्यान कमरेखालच्या भाषेचा वापर करताना थोड्या वेळासाठी xx तोंडात आल्या होत्या, असे वात्रट वक्तव्य केले.

रवी शास्त्री सामना जिंकल्यानंतर स्टुडिओत बसलेल्या व्यक्तींशी गप्पा मारत होते. सामन्याबद्दल शास्त्रींना विचारले असता ते म्हणाले, ‘आय जस्ट से इन हिंदी जस्ट अ लिटल व्हाइल अॅगो, बिलकूल छोडेंगे नही, लेकिन थोडी देर के लिए वहा पर xx मुंह मे था.’ नेटकऱ्यांनी शास्त्रींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शास्त्रींवर टीकांचा भडीमार केला आहे.

भारताच्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने कर्णधार टीम पेन आणि पॅट कमिन्सच्या भागीदारीच्या जोरावर सामन्यात रंगत निर्माण केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना सामना जिंकला. पहिल्या डावात १२३ आणि दुसऱ्या डावात ७१ धावा केल्याबद्दल चेतेश्वर पुजाराला सामनावीर पुरस्कार मिळाला.

Leave a Comment