ही महिला पुरुषांना विचित्र सेवा देऊन तासाला कमावते ७ हजार रुपये

petra
लंडन – जगभरात अनेक विचित्र पद्धतीचा अवलंब पैसे कमावण्यासाठी केला जातो. आता या महिलेचेच पाहा ना..! लोकांना मिठ्या मारून ही महिला लाखो रुपये महिना कमावते. याबाबत माहिती देताना लंडनमध्ये राहणारी पेट्रा सजबान हिने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी तिने हे विचित्र काम सुरू केले होते. लोक आता तिच्या या सर्व्हीससाठी जणू वेडे झाले आहेत. या कामाला पेट्रा सोशल सर्व्हीस असे म्हणतात. या कामावर तिच्या पतीलाही आक्षेप नाही.

पेट्राने सांगितले की, ती तीन वर्षांपूर्वी एका हॉस्पिटलमध्ये केअर असिस्टंटचे काम करत होती. ती येथे काम करताना अर्धांगवायू झालेल्या अनेक रुग्णांची मदत करायची. एकदा तिच्या लक्षात आले की, अशाच एका अर्धांगवायू झालेल्या महिलेला ती जवळ असल्याने चांगले वाटले.

महिलेला पेट्राने विचारले की, ती तिला एकदा मिठी मारू शकते का? त्या महिलेला बोलता येत नव्हते, त्यामुळे तिने डोळ्यांनीच होकार दर्शवला. पेट्राने यानंतर तिला रोज मिठी मारायला सुरुवात केली. पेट्राने म्हटले की, त्या महिलेला तिने मिठी मारणे फार चांगले वाटत होते. हळू हळू तिच्या तब्येतीत सुधारणा व्हायला लागली. यानंतर पेट्राला मिठी मारण्याच्या सर्व्हीसची आयडिया आली.

यानंतर पेट्राने इंटरनेटवर सर्च केले तेव्हा तिला समजले की, मिठी मारणे ही देखील एक कला आणि एक थेरपी असून यानंतर प्रोफेशनल कडलरचा कोर्स करून तिने डीग्रीही घेतली. पेट्राने डीग्री घेतल्यानंतर प्रोफेशनल कडलिंगेची सर्व्हीस द्यायला सुरुवात केली. सर्वात आधी तिने पतीबरोबर याबाबत चर्चा केली. तिला पतीने पाठिंबा दिला. पण तिचे मित्र मात्र नाराज होते. त्यांना पेट्रोच्या सुरक्षेबाबत काळजी वाटत होती.

पेट्राने सांगितले की, एक ३० वर्षांचा व्यक्ती तिचा सर्वात पहिला ग्राहक होता. कामाने तो फार कंटाळलेला होता. त्याला स्ट्रेसमुळे झोपही येत नव्हती. पेट्राला तो भेटला आणि कडलिंग सर्व्हीसनंतर त्याला भरपूर फायदा झाला. पेट्राने म्हटले, ग्राहकांशी मी बराचवेळ चर्चा करते. त्यांच्या समस्या ऐकूण घेते. त्यांचे केस व्यवस्थित करते. केसातून हात फिरवते. बोलताना त्यांना मिठी मारते, त्यांचा हात पकडते. हे सर्व एखाद्या प्रोफेशनलसारखे असते. आधीच मी त्यांना लिमिट्स सांगत असते. पेट्रा म्हणाली की, माझ्याबरोबर वेळ घालवून लोकांना रिलॅक्स वाटते हे पाहून मला चांगले वाटते. ते सर्व तणाव विसरतात. पेट्राने आतापर्यंत ५० लोकांबरोबर वेळ घालवला आहे. त्यात काही ५० वर्षांचे होते तर काही २० वर्षांचेही होते.

Leave a Comment