…या कारणामुळे भारतीय संघ ठरला पहिला आशियाई संघ

team-india
अॅडलेड – अॅडलेड ओव्हल येथील मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पहिला कसोटी सामना झाला. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० ने आघाडी तर घेतलीच, पण एक नवा विक्रमही त्यासोबत केला. एका वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे.

यावर्षीच्या सुरुवातीला भारताने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळली होती. भारताचा या मालिकेत २-१ ने पराभव झाला होता. त्यानंतर इंग्लंड येथे झालेल्या कसोटी मालिकेत भारताला ४-१ ने हरवले असले, तरी भारताने १ सामना जिंकला होता. आता चालू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे. एकाचवर्षी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशात कसोटी सामना जिंकणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला आहे. याआधी कोणत्याही आशियाई संघाला या ३ देशांमध्ये एकाचवर्षी कसोटी सामना जिंकता आलेला नाही.

Leave a Comment