ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या नावे ‘हा’ लाजीरवाणा विक्रम

tim-paine
अॅडिलेड – ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे नेतृत्त्व स्वीकारल्यानंतर सुरूवातीला टिम पैनमध्ये खूप उत्साह दिसून आला. पण कंगारुचा संघ त्याच्या नेतृत्वाखाली चांगले प्रदर्शन करत असल्याचे दिसून येत नाही. ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाने सोमवारच्या सामन्यात ३१ धावांनी हरविले. ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधाराच्या नावावर या पराभवामुळे एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

स्टीव स्मिथवर बंदी घातल्यानंतर टिम पैनची कर्णधारपदी निवड झाली. आतापर्यंत ४ कसोटी सामन्यात संघाचे टिमने नेतृत्व केले आहे. त्या चारही सामन्यात पराभव झाला आहे. गेल्या ९० वर्षात सलग ४ कसोटी सामन्यात पराभव होणारा ऑस्ट्रेलियन कर्णधार बनला आहे. यापूर्वी सलग ४ कसोटी सामन्यात पराभव झालेल्या संघाचा कर्णधार जॅक रायडर होते. १९२८-२९ च्या अॅशेज मालिकेत रायडर यांच्या नेतृत्वाखाली सलग ४ सामन्यात पराभव झाला होता. रायडर यांनी केवळ ५ सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केले आहे. त्यावेळी सलग ४ पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने शेवटच्या पाचव्या कसोटीत विजय मिळविला होता. त्यानंतर रायडर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती.

Leave a Comment