शेअर बाजार पाचराज्यांचे निकाल, पटेलांच्या राजीनाम्यामुळे गडगडला

share-market
नवी दिल्ली – मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज यायला सुरुवात झाली असून शेअर बाजारवर याचा थेट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शेअर बाजार आज खुला होताच सेंसेक्स ५०० अंकांनी घसरून ३४,४५८. ८६ वर आला आहे.

तत्पूर्वी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी सायंकाळी राजीनामा दिला. शेअर बाजारावर याचाही मोठा प्ररिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या पाचही राज्यांमधून येत असलेल्या निकालात काँग्रेस सर्वाधिक जागांवर आघाडीवर दिसत असल्यामुळे या निकालाकडे शेअर बाजारचीही नजर आहे. भाजपने उत्तर भारतातील संबंधित तिनही मोठ्या राज्यांमध्ये सत्ता गमावली तर याचा थेट परिणाम बाजारावर दिसेल, असे बोलले जात आहे. कारण या राज्यांच्या निवडणुकांकडे आगामी २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने बघितले जात आहे.

Leave a Comment