लंकेच्या अकिला धनंजयच्या नियमाबाह्य गोलंदाजीकेल्याप्रकरणी आयसीसीची बंदी

akila-dhananjay
दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) श्रीलंकेचा ऑफ स्पिनर अकिला धनंजय याची गोलंदाजी शैली नियमाबाह्य आढळून आल्याने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली.

धनंजयची शैली आयसीसीच्या स्वतंत्र अवलोकन चमूला अवैध आढळून आली. तो चेंडू टाकताना १५ अंशापेक्षा अधिक कोनात चेंडू टाकत असल्याचे आढळून आले. यंदा इंग्लंडविरुध्दच्या गॉल कसोटीत धनंजयच्या गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह असल्याचा अहवाल देण्यात आल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेन येथे त्याची चाचणी घेण्यात आली. त्यात तो अयशस्वी ठरला होता. आयसीसीकडून निलंबित केलेल्या अकिला धनंजयने त्याच्या गोलंदाजी शैलीत बदल केल्यानंतर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो पुनरागमन करू शकतो.

Leave a Comment