नवी दिल्ली – कालपासून आग्र्याच्या ताजमहालच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आली असून पर्यटकांना नव्या तिकीट दरांनुसार आता ५० रुपयांऐवजी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर १३०० रुपये शुल्क परदेशी पर्यटकांकडून आकारले जाणार आहे. त्याचबरोबर सार्क देशांमधून आलेल्या पर्यटकांना ५४० रुपयांऐवजी ७४० रुपये शुल्क आकारले जाईल.
आग्र्याच्या ताजमहालचे सौंदर्य न्याहाळणे झाले महाग
ताजमहालच्या मुख्य ढाच्यावरील भार गर्दी आटोक्यात आणून कमी करण्यासाठी हा निर्णय भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मुख्य कबरीच्या दर्शनासाठी २०० रुपयांचे हे शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबत इंडियाटुडेने दिलेल्या वृत्तानुसार ताजमहालच्या तिकीट दरात २०१६ नंतर झालेली ही आठवी दरवाढ आहे. भारतीय पर्यटकांना यापूर्वी ५० रुपये आणि विदेशी पर्यटकाला ११०० रुपये मोजावे लागत होते.