सर्व भारतीयांना उर्जित पटेलांच्या राजीनाम्याची चिंता वाटायला हवी – रघुराम राजन

raghuram-rajan
नवी दिल्ली – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली असून सर्व भारतीयांनाच उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याविषयी चिंता वाटायला हवी, असे सूचक वक्तव्य करत केंद्र सरकार आणि आरबीआय यांच्यातील वादावर त्यांनी बोट ठेवले. राजीनामा देणे हे सरकारी अधिकाऱ्याच्या भात्यातील निषेधाचे शेवट अस्त्र असल्याचे म्हणत केंद्र सरकारवर त्यांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.

२०१६ साली रघुराम राजन यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर उर्जित पटेल यांची नोटबंदी निर्णयाच्या २ महिन्यांपूर्वीच गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. सरकार आणि आरबीआयतील बेबनावामुळे गेल्या काही दिवसांपासून उर्जित पटेल राजीनामा देणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले होते. ती शंका अखेर आज खरी ठरली आणि कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच उर्जित पटेलांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला.

Leave a Comment