महिंद्राची फॉर्म्युला इ रेसिंग एम ५ इलेक्ट्रो

e-mahind
भारतातील लोकप्रिय ऑटो कंपनी महिंद्राने फॉर्म्युला इ रेसिंग कार एम ५ इलेक्ट्रो भारतात सादर केली आहे. एबीबी एफआयए फॉर्म्युला इ चँपियनशिपचा पाचवा सिझन सुरु होण्यापूर्वीच ती लाँच करण्यात आली आहे. सौदी अरेबियात अद दिराय मध्ये १५ डिसेंबरला हि कार पहिल्या रेसमध्ये उतरणार आहे.

सेकंड जनरेशनच्या या कार मध्ये इव्ही पॉवर ट्रेन तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून हि कार २.८ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग घेऊ शकते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी २८० किमी. रेड व्हाईट, ब्लू अश्या तीन रंगांच्या कॉम्बिनेशन मध्ये असलेली हि कार अतिशय आकर्षक दिसते आहे. टीम कीटसाठी बंगाल वाघ आणि कमळ फुलापासून प्रेरणा घेतली गेली आहे.

Leave a Comment