येथे बजरंगबली करतात असाध्य रोगांवर उपचार

bajrangbali
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे असलेले त्रिलोकीधाम हनुमान मंदिर देशात अनोख्या कारणाने चर्चेत आहे. या मंदिरात येऊन जो कुणी हनुमानासमोर नतमस्तक होऊन मनापासून प्रार्थना करतो त्याच्या सर्व व्याधी दूर होतात असे सांगितले जाते. अगदी कॅन्सर, टीबी, एड्स, मूत्रपिंडाचे आजार असे गंभीर आजारही येथे बजरंगबलीची पूजा केल्याने दूर होतात. ज्यांना हा अनुभव येतो ते पुन्हा परिवारासह या बजरंगबळीच्या दर्शनाला येतात.

या मंदिरात दैवी शक्तीचा वास आहे असा विश्वास आहे. येथे येऊन भाविकाने डोके टेकवायचे आणि एक सिद्ध मंत्र दिला जातो त्याच्या जप ९० दिवस करायचा. हा जप दर्शन घेऊन झाल्यावर घरी जाऊन केला तरी चालतो. ९० दिवसात आजाराला उतार पडतोच असा अनुभव येतो. या मंदिरात हनुमानाबरोबर २१ शिवपिंडी आहेत. दर हनुमान जयंतीला येथे खूप गर्दी असतेच पण वर्षभरही भाविक येथे मोठ्या संखेने येतात.

Leave a Comment