नोकिया ८.१ भारतात लाँच

nokia8
एचएमडी ग्लोबलने गेल्या आठवड्यात दुबईत लाँच झाल्यावर नोकिया ८.१ स्मार्टफोन नवी दिल्ली येथील इवेन्ट मध्ये भारतात लाँच केला आहे. या फोनची भारतातील किंमत २६९९९ रु. असून त्याची विक्री २१ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. सुरवातीच्या ऑफर मध्ये एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट डेबिट कार्ड ग्राहकांना १० टक्के सवलत दिली जाणार आहे तर एअरटेलने युजरना १ टीबी डेटा फ्री देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

या फोनला ६.१८ इंची फुल एचडी प्लस स्क्रीन, २.५ डी कर्व्हड ग्लास, ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने ४०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, मेटल फ्रेम, ड्युअल सिम, १२ एमपी आणि १३ एमपीचे ड्युअल रिअर कॅमेरे, सेल्फी साठी २० एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ९.० पाय ओएस दिली गेली आहे. यात बोथी फिचर दिले गेले असून त्यामुळे युजर एकाचवेळी फ्रंट आणि रिअर कॅमेऱ्याचा वापर करून फोटो काढू शकणार आहे. फोन ला ३५०० एएमएच बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment