जगभरातील टी-२० स्पर्धेत भाग घेवू शकतो डेव्हिड वॉर्नर

david-warner
नवी दिल्ली – चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर सध्या १ वर्षाची बंदी आहे. वॉर्नर बंदी असताना ऑस्ट्रेलिया संघात खेळू शकत नाही. पण जगभरातील टी-२० स्पर्धेत तो भाग घेवू शकतो. आता ५ जानेवारपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सिल्हेट सिक्सर्स संघाकडून खेळण्याबरोबर वॉर्नर या संघाचे नेतृत्वही करणार आहे.

वॉर्नर आणि स्मिथ यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध यावर्षी झालेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केली होती. त्यामुळे दोघांवर १ वर्ष बंदीची शिक्षा झाली होती. दोघांनीही त्यानंतर कॅनडा येथील ग्लोबल टी-२० लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहभाग घेतला होता. वॉर्नरला या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. कॅनडा येथे १०९ धावा, तर कॅरेबियन लीगमध्ये त्याला केवळ २२० धावाच करता आल्या होत्या.

यावर्षी सिल्हेट सिक्सर्सने २ विदेशी खेळाडूंना संघात दाखल केले आहे. नेपाळच्या संदीप लमिच्छाने नंतर डेव्हिड वॉर्नर हा दुसरा विदेशी खेळाडू सिल्हेट सिक्सर्स संघात दाखल झाला आहे. बीपीएलमध्ये स्टिव्ह स्मिथ कॉमिला व्हिक्टोरियन संघाकडून खेळणार आहे.

Leave a Comment