ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ‘का’ बांधल्या होत्या काळ्या फिती?

australia
अॅडलेड – ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिला कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या दिवशी (९ डिसेंबर) मैदानात दंडाला काळी पट्टी बांधून मैदानात उतरला होता. ८ डिसेंबरला ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज कॉलिन गेस्ट यांचे निधन झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काळ्या फिती त्यांना आदरांजली वाहण्यासाठी बांधल्या होत्या.

कॉलिन गेस्ट यांनी १९६३ साली जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हा त्यांचा एकमेव आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात त्यांना एकही विकेट घेता आली नव्हती. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना ३६ सामन्यात ११५ गडी बाद केले आहेत.

याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट म्हणाले, क्रिकेटसाठी कॉलीन गेस्ट यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वतीने मी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.

Leave a Comment