वैयक्तिक कारणामुळे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

urjit-patel
मुंबई – आपल्या पदाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला आहे. मी हे पद वैयक्तिक कारणांमुळे सोडतो असल्याचे उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. हे वृत्त केंद्र सरकार आणि आरबीआय वादाच्या पार्श्वभूमीवर समोर आले आहे. माझ्यासाठी आरबीआयमध्ये गव्हर्नर पदावरा काम करणे ही सन्मानाची बाब असल्याचेही उर्जित पटेल यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या पदाचा आपण राजीनामा त्वरित देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोदी सरकारसाठी हा मोठा झटका मानला जातो आहे.

माझ्यासाठी आरबीआयच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करणे हा गौरव होता. माझ्या सहकाऱ्यांचे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो मला त्यांनी खूप सहकार्य केले असे म्हणत कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये उर्जित पटेल यांची नियुक्ती केली होती. आता त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे पद सोडल्याचे जाहीर केले असले तरीही हा मोदी सरकारसाठी झटका मानला जातो आहे.

Leave a Comment