केरळ बनले चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले पहिले राज्य

kannur
केरळ मधील कुन्नूर येथे रविवारी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर केरळ देशातील पहिले चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य बनले आहे. या विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय सुरेश प्रभू आणि केरळचे मुख्यमंत्री पिनारगी विजयन यांच्या हस्ते झाले. येथून अबुधाबी येथे पहिले उड्डाण झाले. या कार्यक्रमाला सुमारे १ लाख लोक उपस्थित होते.

कुन्नूर विमानतळ २ हजार एकर जागेत पसरलेला असून वर्षाला दहा लाख प्रवासी वाहनाची त्याची क्षमता आहे. या विमानतळासाठी १८०० कोटी रु. खर्च आला असून केरळ मधील अन्य तीन विमानतळ तिरुवनंतपुरम, कोच्ची आणि कोझिकोडे येथे आहेत. कुन्नूर विमानतळ रनवेची लांबी वाढवून ४ हजार मीटर केली गेली आहे.

या विमानतळ उद्घाटन समारंभावर भाजप आणि कॉंग्रेस अश्या दोन्ही पक्षांनी बहिष्कार घातला होता. कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री ओमान चंडी यांना आमंत्रण न दिल्यावरून बहिष्कार घातला होता तर भाजपने केरळ सरकारने सबरीमला प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरून बहिष्कार घातला होता.

Leave a Comment