शाओमी मी मिक्स ३ चे ५ जी व्हेरीयंट लाँच

mix3
आघाडीची स्मार्टफोन कंपनी शाओमीने त्यांच्या नुकत्याच लाँच झालेल्या मी मिक्स ३ स्मार्टफोनचे फाईव्ह जी व्हेरीयंट चीन मध्ये नुकतेच सादर केले असून हा फोन बाजारात २०१९ मध्ये दाखल होणार आहे. या स्मार्टफोन साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर दिला गेला आहे. या स्मार्टफोनचे फोटो शाओमीचे प्रेसिडेंट लीन बिन यांनी शेअर केले आहेत.

फाईव्ह जी वेरियंट मध्ये व्हिडीओ स्ट्रीमिंग आणि वेब सर्फिंग एकत्र करता येणार आहे. क्वालकॉमचा ८५५ प्रोसेसर केल्याच महिन्यात लाँच केला गेला आहे. हा प्रोसेसर ५ जी सपोर्ट सह येतो आणि त्यामुळे युजरला२ जीबीपीएस स्पीड मिळतो. या फोनसाठी १० जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले गेले आहे. रिअरला १२+१२ एमपीचे ड्युअल कॅमेरे तर फ्रंटला २४ एमपी आणि २ एमपीचा ड्युअल कॅमेरा दिला गेला आहे.

शाओमी बरोबरच वन प्लस, सॅमसंग, विवो या कंपन्या पुढच्या वर्षात त्यांचे ५ जी फोन बाजारात आणत आहेत.

Leave a Comment