गुन्हेगाराने पोलिसांनी दिलेल्या त्याच्याच नावाच्या वाँटेड जाहिरातीला प्रतिसाद देऊन ४८ तासात हजर होतो असे उत्तर देऊन पोलिसांची दिल जिंकण्याची घटना अमेरिकेत घडली. अमेरिकेतील रिचलंड पोलीस विभाग सोशल मिडीयावर गुन्हेगारांना पकडण्यासाठी जाहिराती देतात. तशीच जाहिरात त्यांनी अँथनि एकर्स या गुन्हेगाराच्या नावाने फेसबुकवर दिली होती. या जाहिरातीत पोलिसांनी आम्ही या गुन्हेगाराला पकडू शकलेलो नाही तेव्हा कुणाला माहिती असल्यास या नंबरवर कळवावे असे म्हटले होते.
वाँटेड गुन्हेगाराचे पोलीस जाहिरातीला उत्तर- ४८ तासात होतो हजर
विशेष म्हणजे जाहिरात आल्यावर खुद्द अँथनीनेच जाहिरातीला उत्तर दिले आणि शांत राहा, ४८ तासात तुमच्यासमोर हजर होतो असे कळविले. त्यावर पोलिसांनी त्याला स्टेशनवर येण्यासाठी गाडी हवी काय असे विचारले तेव्हा अँथनीने त्यांचे दिलेल्या ऑफर बद्दल आभार मानले. तो म्हणाला गेला महिनाभर मी तुमच्याच भागात आहे. ४८ तासात येतो. मात्र अँथनी आला नाही. अर्थात त्याने त्याबद्दल पोलिसांची माफी मागितली आणि लिहिले मी नेहमी माझा शब्द पाळतो पण आज पाळू शकलो नाही. तरी उद्या लंच टाईम अगोदर येतो आणि आलो नाही तर फोन करून गाडी मागवून घेईन.
दुसऱ्यावेळीही अँथनीने शब्द मोडला तेव्हा पोलिसांनी त्याला तू कुठे आहेस फोन कर, न्यायला येतो असे सांगितले. हा वादा अँथनीने पाळला आणि तो पोलिसांना शरण आला. पोलिसांबरोबर त्याने सेल्फी घेतली आणि सोशल मिडीयावर ती शेअर करताना स्वीटहार्ट बरोबर डेटवर आलोय अस मजकूर लिहिला.