राजकारणात येणार नाही गौतम गंभीर

gambhir
क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलेला आघाडीचा फलंदाज आणि टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावलेला गौतम गंभीर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गौतमनेच पूर्णविराम दिला असून राजकारणात येण्याचा माझा विचार नाही असे स्पष्ट केले आहे. ३७ वर्षीय गंभीरने दिल्लीत त्याच्या करियरचा शेवटचा रणजी सामना खेळताना शतक झळकावले आहे. त्याला भावपूर्ण निरोप दिला गेला त्यावेळी तो बोलत होता.

गौतम म्हणाला मी नेहमी सामाजिक प्रश्नावर बोलतो त्यामुळे मी राजकारणात येईन असा अंदाज वर्तविला गेला असावा. पण कोणतीही निवडणूक लढविण्याचा माझा विचार नाही. ट्विटरचा मंच माझ्यासाठी महत्वाचा आहे कारण तेथे मी सामाजिक मुद्दे मांडू शकतो आणि भारताचा नागरिक म्हणून मला तो अधिकार आहे. राजकारण हे वेगळे क्षेत्र आहे आणि गेल्या २५ वर्षात मी क्रिकेट शिवाय दुसरे काहीच केलेले नाही.

निवृत्तीनंतर दिल्लीतील युवा क्रीडेत खेळाडूना मार्गदर्शन करणे आवडेल असेही तो म्हणाला. प्रशिक्षकपद्ची संधी मिळाली तर विचार करेन मात्र कोणत्याची परिस्थितीत क्रिकेट प्रशासनात जाणार नाही असे सांगून तो म्हणाला मी फार स्पष्टवक्ता आहे आणि असे लोक प्रशासनात सन्मान नसतो.

गौतमने शेवटचा सामना खेळल्यानंतर त्याच्या सर्व बॅट्स टीममधील खेळाडूना वाटून टाकल्या.

Leave a Comment