जागतिक बँकेने नुकत्याच सादर केलेल्या अहवालानुसार परदेशातून मायदेशी पैसे पाठविण्यात सर्व जगात भारतीय आघाडीवर आहेत. २०१८ मध्ये एनआरआय भारतीयांनी मायदेशी ८० अब्ज डॉलर्स पाठविले आहेत. त्यापाठोपाठ चीन ६७ अब्ज डॉलर्स, मेक्सिको ३४, फिलिपिन्स ३४ आणि इजिप्त २६ अब्ज डॉलर्स या देशांचा नंबर आहे.
मायदेशी पैसे पाठविण्यात भारतीय आघाडीवर
जागतिक बँकेने मायग्रेशन अँड रेमिटन्ट या नावाने हा अहवाल नुकताच सादर केला आहे. त्यानुसार परदेशातून मायदेशी पैसे पाठविण्याचे प्रमाण यंदा १०.८ टक्के वाढून ते ५२८ अब्ज डॉलर्सवर गेले आहे. गेली तीन वर्षे परदेशातून मायदेशी पैसे पाठविण्यात भारतीय नागरिकांची टक्केवारी वाढती असल्याचे दिसून आले आहे. २०१६ मध्ये हा आकडा ६२.७ अब्ज डॉलर्स होता तो २०१७ मध्ये ६५.३ तर २०१८ मध्ये ८० अब्ज डॉलर्सवर गेला आहे. मात्र पुढील वर्षात हा दर थोडा कमी होईल असा अर्थतज्ञांचा अंदाज आहे.