भद्रचलम – दक्षिणेतील अयोध्या

bhadra
सध्या देशभरात राम मंदिर मुद्दा चांगलाच गाजत आहे. रामजन्मभूमी अयोध्या येथे राममंदिर उभारणीवरून खडाजंगी सुरु आहे. तेलंगणातील एक जागा दक्षिणेतील अयोध्या या नावाने प्रसिद्ध असून तिचे नाव आहे भद्रचलम. हे गाव मंदिरांचे गाव आहेच पण येथील सीता रामस्वामी मंदिर सर्वात प्रसिद्ध आहे.

parnshala
भद्रचलमपासून ३२ किमी अंतरावर पर्णशाळा नावाचे ठिकाण आहे. येथेहि पर्यटकांची खूप गर्दी असते. राम वनवासात असताना काही वर्षे या जागी राहिले होते असे पुरावे मिळतात. या जागेवरूनच रावणाने सीतेचे अपहरण केले होते असा स्थानिकांचा दावा आहे. पर्यटकांना या ठिकाणी रामायणाशी निगडीत अनेक जागा पाहायला मिळतात. येथे सीतेची पाउले आहेत तसेच कांचनमृग बनून आलेल्या मारीच राक्षसाची, साधू बनून आलेल्या रावणाची, भिक्षा घालणाऱ्या सीतेची, राम, लक्ष्मण याच्या प्रतिमा येथे पाहायला मिळतात.

भद्रचलम मंदिर गोदावरी किनारी असून येथे दररोज सरासरी ५ हजार भाविक येतात. राम भक्त भद्रा याला रामाने आश्वासन दिले होते त्यानुसार भद्राच्या भक्तांना भेटण्यासाठी राम स्वर्गातून येथे येतात असा समज आहे. तेलंगणातील खम्मम जिल्यात हे ठिकाण आहे.

Leave a Comment