ज्येष्ठ महिला क्रिकेटरने साजरा केला १०७ वा वाढदिवस

elin-ash
जगातील सर्वात ज्येष्ठ महिला क्रिकेटरने तिचा १०७ वा वाढदिवस नुकताच साजरा केला आहे. आजही इलिन अॅश नावाची हि खेळाडू महिला ठणठणीत असून तिने तिच्या करियर मधील पहिला क्रिकेट सामना १९३७ मध्ये खेळला होता. ती इंग्लंड महिला क्रिकेट संघातून खेळली होती.

१९११ साली जन्मलेल्या इलिनने १२ वर्षे क्रिकेट खेळले त्यात तिने ७ कसोटी सामने खेळून २३ च्या सरासरीने १० विकेट घेतल्या आहेत. क्रिकेट सोडल्यावर तिने योगाभ्यास सुरु केला आणि गेली ३० वर्षे ती नियमाने योगाभ्यास करते आहे. तिने योगाभ्यासाचे तिचे अनेक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यात एका व्हिडीओ मध्ये ती इंग्लंड महीला हेथर नाईट हिच्याबरोबर दिसते आहे.

Leave a Comment