जगातील पहिली इलेक्ट्रिक बोट कॅडेला सेव्हन

cadela
सिंगल चार्जिंगवर ५८ मैल धावू शकणारी आणि अजिबात आवाज न करणरी जगातील पहिली इलेक्ट्रिक बोट कॅडेला सेव्हन अनेक अर्थाने खास आहे. या बोटीचा टॉप स्पीड ताशी ३४ मैल असून २५ फुट लांबीच्या या बोटीत पाच लोक आरामात प्रवास करू शकतात.

cadela1
या बोटीचा टेकऑफ, कृझिंग, लँडिंग सर्व ऑटोमॅटिक पद्धतीने होते. हि बोट पाण्यावर सहज तरंगावी म्हणून तिची बॉडी कार्बन फायबरपासून बनविली गेली आहे. या बोटीचे डिझाईन करताना तिचा तळ पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर राहील असे केले गेले आहे. या बोटीमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला गेला आहे. हि बोट नेहमीच्या बोटीच्या तुलनेत उर्जेचा वापर ७५ टक्के कमी करते असा दावा केला जातो. या बोटीची किंमत १ कोटी ८० लाख रुपये असून भविष्यात या किमती कमी होतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment