क्युबा मध्ये इंटरनेट सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

cuba
आफ्रिकी देश क्युबा येथील सर्वसामान्य नागरिकांसाठी गुरुवार पासून इंटरनेट सेवा सुरु झाली असून इंटरनेट नसलेला हा जगातील शेवटचा देश आता जगाशी या सेवेने जोडला गेला आहे. क्युबा मधील टेलिकॉम कंपनी इटीइसीएसए तर्फे हि सेवा सुरु केलीली असली तरी त्याचे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर आहेत. येथे चार जीबी डेटा साठी युजरला २१०० रुपये दर महिना मोजावे लागणार आहेत. हि सेवा थ्री जी आहे.

क्युबा मध्ये वास्तवात इंटरनेटसेवा २०१३ सालीच सुरु झाली आहे मात्र ती सर्वसामान्य लोकांसाठी नव्हती. हे सेवा फक्त श्रीमंत लोकांसाठी होती. क्युबाची लोकसंख्या १ कोटी २० लाख आहे. त्यातील ५० लाख नागरिक मोबाईल वापरतात. नागरिकांत मजूर वर्गाची संख्या मोठी असून त्यांना सरासरी मजुरी महिन्याला ३० डॉलर म्हणजे २१०० रु. मिळते. २०१७ साली देशात अनेक ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट, नेट कॅफे सुरु केले गेले असून २० लाख नागरिक त्यांचा वापर करतात असे समजते. मात्र कॅफेमध्ये नेटचा वापर करण्यासाठी तासाला ७० रु. मोजावे लागतात. या तुलनेत भारतात १ जीबी डेटा वापरण्यासाठी ३ रु. मोजावे लागतात. म्हणजे क्युबातील इंटरनेट सेवा भारतापेक्षा १७५ पट महाग आहे.

Leave a Comment