केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना थपडेचा प्रसाद

ramdas
रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शनिवारी सायंकाळी अंबरनाथ येथील कार्यक्रम संपवून परतताना एका युवकाने थप्पड लगावल्याची घटना घडली असून त्यामुळे संतापलेल्या पक्ष कार्यकर्त्यांनी आज म्हणजे रविवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रवीण गोस्वामी या तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम अंबरनाथचा नेताजी चौक हा भाग रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. शनिवारी रामदास आठवले येथे भाषण करण्यासाठी आले होते. भाषण करून मंचावरून खाली उतरल्यावर प्रवीण गोस्वामी या तरुणाने अचानक त्यांना थप्पड लगावली. त्याने हा हल्ला का केला त्याचे कारण समजू शकलेले नाही मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी त्वरित प्रवीणला बेदम मारहाण केली. या दरम्यान पोलिसांनी त्याला अटक करून ताब्यात घेतले.

या घटनेने चिडलेले पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकारी आठवले यांच्या निवासस्थानी जमले आणि त्यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. या हल्ल्यामागील मास्टरमाइंडला त्वरित पकडले जावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Comment